१०० टक्के गुण मिळवणाऱ्या कृष्णा भांबुरेचे शिंपी समाजाकडून कौतुक

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड दि. प्रतिनिधी :
फलटण तालुक्यातील जाधववाडी येथील विद्यार्थी कृष्णा विष्णू भांबुरे याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एसएससी परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाबद्दल सातारा जिल्हा शिंपी समाजाचे अध्यक्ष इंजि. सुनिल पोरे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

इंजि. पोरे म्हणाले की, कृष्णा भांबुरे हा जाधववाडी गावचा रहिवासी असून त्याने सर्व विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत शंभर पैकी शंभर गुण मिळवले आहेत. त्याच्या या अभूतपूर्व यशामुळे परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

“कृष्णाने हे यश संपादन करून शिंपी समाजाचे नाव उज्ज्वल केले असून समाजाला त्याचा सार्थ अभिमान वाटत आहे. या यशामध्ये त्याचे आई-वडील व शिक्षक यांचाही मोठा वाटा आहे,” असेही पोरे यांनी सांगितले.

तसेच सातारा जिल्ह्यातील समस्त शिंपी समाज बांधवांकडून कृष्णाचे अभिनंदन करण्यात येत असून त्याच्या पुढील शिक्षणासाठी शिंपी समाज खंबीरपणे पाठीशी उभा राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *