गोंदवले येथे बेकायदा दारू विक्रीवर दहिवडी पोलिसांची कारवाई
व्हिजन २४ तास न्यूज
दहिवडी :- प्रतिनिधी
माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे बेकायदा देशी दारू विक्री करणाऱ्यावर दहिवडी पोलिसांनी कारवाई करत ४ हजार ४१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १२ मे रोजी दुपारी आप्पा महाराज चौकातील कमानीजवळ करण्यात आली.
याप्रकरणी संजय शंकर पाटोळे (वय ४२, रा. गोंदवले बुद्रुक, ता. माण, जि. सातारा) याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अन्वये दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीकडून टूबर्ग स्ट्रॉंग, किंगफिशर स्ट्रॉंग तसेच टॅंगो पंच या देशी दारूच्या बाटल्या असा एकूण ४४१५ रुपयांचा माल जप्त केला. हा माल पत्र्याच्या आडोशाला चोरट्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ शिवाजी नरबट यांनी फिर्याद दिली असून, आरोपीस नोटीस देण्याची कार्यवाही सुरू आहे.
सपोनी दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पो.हवा. आर. पी. खाडे करीत आहेत.

