पु. ल. देशपांडे महाराष्ट्र अकादमीत गुरुवारी रंगणार स्त्री गझलकारांचा मराठी गझल मुशायरा*

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज 

गणेश तळेकर 

मुंबई :-प्रतिनिधी

गझलसम्राट स्व. सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त अभंग क्रीएटिव्ह, पार्थ थिएटर प्रस्तुत आणि सिनेरंग फाऊंडेशनच्या वतीने स्त्री गझलकारांचा ‘गझल माझी सखी’ हा मराठी गझल मुशायरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, १६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी लघु नाट्यगृह, तिसरा मजला, प्रभादेवी, मुंबई येथे रंगणार आहे.

यावेळी खान्देशातील ज्योत्सना राजपूत, पनवेलमधील सुनिता रामचंद्र, पंढरपूरमधील राधिका फराटे, रत्नागिरीतील श्रद्धा खानविलकर, वसईतील स्वाती शुक्ल या गझलकार सादर करणार आहेत. या कार्यक्रमात प्रवेश विनामूल्य असून पहिल्या तीन रांगा राखीव असणार आहेत.

या कार्यक्रमासाठी स्काय रुट मीडिया आणि मीडिया माईंड क्रिएशन यांनी विशेष सहकार्य केले आहे. अधिक माहितीसाठी ९५९४०७०९६६ /९९३०५५३३१८ या क्रमांकावर संपर्क साधावा.
………….


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *