उंब्रजमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ जनजागृती अभियान उत्साहात संपन्न
व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते | उंब्रज
उंब्रज येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान जनजागृती अभियान’ (टप्पा क्र. १) अंतर्गत महसूल सेवा पंधरवड्याचे शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून विविध शासकीय सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आल्या.
या शिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय दाखले वितरित करण्यात आले. तसेच गावठाण विकासासाठी आवश्यक असलेले नकाशे संबंधित गावांना सुपूर्द करण्यात आले. याशिवाय परिसरातील गावांमध्ये भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात येऊन त्या तातडीने सोडवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले.
या अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक आमदार मनोज दादा घोरपडे यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यांच्या या पुढाकाराबद्दल ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य रणजीत जाधव यांनी आभार व्यक्त केले.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, जिल्हा परिषद सदस्य रणजीत जाधव, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे शिबिर म्हणजे शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करणारे ठरले असून, प्रशासनाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे उत्तम उदाहरण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

