नगरसेवक पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर — ८ ऑक्टोबरला उमेदवारांच्या भवितव्याची दिशा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड:प्रतिनिधी
राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या आगामी निवडणुकांची रणधूमाळी अधिकच रंगतदार होणार आहे. नगराध्यक्षपदांच्या आरक्षण सोडतीनंतर आता नगरसेवकपदांच्या आरक्षण प्रक्रियेलाही सुरुवात होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने ३ ऑक्टोबर रोजी याबाबतचा आदेश जारी केला असून, ८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सदस्यपदांची (नगरसेवक) आरक्षण सोडत काढली जाणार आहे.

      या सोडतीत राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींतील सदस्यपदांचे आरक्षण निश्चित केले जाणार असून फलटण नगरपरिषदेचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि स्थानिक राजकीय गटांचे लक्ष आता ८ ऑक्टोबरकडे खिळले आहे. आपल्या प्रभागाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघणार, यावर अनेकांचे राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत.

 आरक्षण सोडतीचा संपूर्ण कार्यक्रम:

८ ऑक्टोबर – जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागासवर्ग प्रवर्ग व महिलांसाठी सदस्यपदांची आरक्षण सोडत.

९ ऑक्टोबर – जिल्हाधिकारी प्रारुप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करतील.

९ ते १४ ऑक्टोबर – नागरिकांकडून हरकती व सूचना नोंदवता येणार.

२४ ऑक्टोबरपर्यंत – विभागीय आयुक्त हरकतींचा विचार करून आरक्षणाला अंतिम मान्यता देतील.

२८ ऑक्टोबरपर्यंत – मुख्याधिकारी अंतिम आरक्षण अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करतील.

        नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीची तारीख ६ ऑक्टोबर निश्चित झाल्याने, त्यानंतर लगेच नगरसेवकपदांसाठीची प्रक्रिया सुरू होणार आहे. या दोन्ही सोडतींमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल औपचारिकरित्या वाजले आहे.

स्थानिक पातळीवर अनेक उमेदवार आरक्षणाच्या निकालानुसार पुढील रणनीती आखणार असून, राजकीय चर्चांनाही आता अधिक उधाण येण्याची चिन्हे आहेत.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *