म्हसवड ते अक्कलकोट पायी वारीचे भक्तिमय प्रस्थान

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड, ता. माण:

           म्हसवड येथील लखन लोखंडे व त्यांच्या मित्रमंडळाच्या पुढाकाराने मोठ्या भक्तिभावाने म्हसवड ते अक्कलकोट पायी दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. ही वारी माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे 50 हजार मतांनी विजयी व्हावेत, यासाठी लखन लोखंडे यांनी केलेल्या नवसपूर्तीनिमित्त काढण्यात आली आहे.

आज सकाळी दिंडीचा प्रारंभ म्हसवड येथून करण्यात आला. यावेळी दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले. वारीतील भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी परिसरातील अनेक मान्यवर आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रचंड विजयासाठी लखन लोखंडे यांनी केलेला नवस पूर्ण करण्यासाठी ही वारी काढण्यात आली आहे. या वारीचा उद्देश भक्तीभाव जोपासणे आणि अक्कलकोट स्वामी समर्थांच्या चरणी आभार व्यक्त करणे, असा आहे.

दिंडीच्या प्रस्थानावेळी म्हसवडमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. स्वामी समर्थांच्या जयघोषात दिंडी पुढे रवाना झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय धट, इंजिनीयर सुनील पोरे, पत्रकार विजय पाटील, नागनाथ डोंबे, तसेच सिद्धनाथ सालकरी, महेश गुरव, वासुदेव गुरव, किरण लोखंडे, बापू लोखंडे, राजु लोखंडे यांच्यासह अनेक भक्तगण उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *