अशोक माने यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 
म्हसवड : प्रतिनिधी 
ज्योतिर्लिंग हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज पवारवाडीचे उपशिक्षक अशोक सदाशिव माने यांचा सेवानिवृत्तीनिमित्ताने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते 

यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य सहदेव गुरव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून स्कूल कमिटीचे सदस्य शिवाजी आण्णा पवार, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विष्णू ताम्हाणे नगरसेवक विकास काकडे मा.प्रा सुधीर अहिवळे,प्रगतशील व्यवसायिक सतिश शहा,सुरेंद्र चव्हाण                श्रीराम बझारचे अध्यक्ष जितेंद्र पवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित काटकर म्हणाल की नोकरी किती केली यापेक्षा कशी केली हे महत्वाचे आहे आज या ठिकाणी ग्रामस्तांची व माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहता माने सरांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावले असल्याचे लक्षात येते. सुधीर अहिवळे म्हणाले की स्वतः दिव्याप्रमाणे जळून विद्यार्थ्यांना प्रकाश देण्याचे काम शिक्षक करीत असतात.भावी पिढी सुसंस्कृत करण्याची जबाबदारी शिक्षकांच्यावर असते माने सरांनी ती जबाबदारी पार पाडली आहे.
                 यावेळी बोलताना विकास काकडे म्हणाले की शिक्षकांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवले पाहिजे त्यासाठी अवांतर वाचन केले पाहिजे त्यातून मिळालेली माहिती विद्यार्थ्यांना दिली पाहिजे.
         कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य गुरव म्हणाले की शाळेतील हरहुन्नरी व उपक्रमशील व्यक्तिमत्त्व तसेच प्रत्येक कार्यात पुढे असायचे. विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे व अभ्यासाची गोडी निर्माण करण्याचे त्यांनी केले होते माने सरांचा आदर्श इतर शिक्षकांनी घेतला पाहिजे.
कार्यक्रमासाठी माजी प्राचार्य विठ्ठल हंकारे, मा.प्रा. किकले,मा.प्रा.कांतिलाल खुरंगे,मा.मुख्याध्यापक रमेश जगताप, पोपट कातळगे, शरद तुपे, अहमद मुल्ला, विजय भागवत, डी.एन.जगताप यांचेसह अनेक ग्रामस्त नातेवाईक माजी विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *