कोळी महासंघाच्या राज्य सदस्य पदी व माढा लोकसभा अध्यक्षपदी अण्णासाहेब कोळी यांची नियुक्ती
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड :प्रतिनिधी :
कोळी समाज संघटनांची शिखर संस्था असलेली कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या राज्य सदस्य पदी व माढा लोकसभा अध्यक्षपदी आण्णासाहेब कोळी यांची सर्वांनुमते नियुक्ती करण्यात आली.
लोणावळा येथे कोळी महासंघाची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. यावेळी सहा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आल्या.


