दहिवडीतील शिवनंदन हॉटेलसमोर दुचाकीची जोरदार धडक; महिला ठार, अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)

सादिक शेख
दहिवडी (ता. माण) | प्रतिनिधी
दहिवडी-गोंदवले रस्त्यावर शिवनंदन हॉटेलसमोर भरधाव दुचाकीची धडक लागून गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दिनांक 13 जून 2025 रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. रिना नरसिंग सहानी (वय 40, रा. खडकओढा, गोंदवले बु.) या महिला रस्ता ओलांडत असताना, गोंदवलेच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या काळ्या रंगाच्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिना सहानी यांच्यावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, 18 जून रोजी दुपारी 12.45 वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी रिना सहानी यांचा मुलगा रमेशकुमार नरसिंग सहानी (वय 21) याने फिर्याद दिली असून, अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध BNS कलम 281, 125(b), 106 आणि मोटार वाहन कायदा कलम 184, 134(A), 134(B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास सपोनि दत्तात्रय  दराडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश खाडे करत आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *