शास्ञीनगर विभागात आमदार अतुलबाबा भोसले यांचा भव्य नागरी सत्कार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
कुलदीप मोहिते
कराड (प्रतिनिधी)
कराड तालुक्यातील मलकापूर शहरातील शास्ञीनगर विभागाच्या कायमस्वरूपी क्रॉसिंगच्या मंजुरीनंतर आमदार अतुलबाबा भोसले यांचा शास्ञीनगर विभागाच्यावतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी परिसरातील नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील उड्डाणपूल पिलर क्र. ७५ ते ७६ दरम्यान पूर्व-पश्चिम विभागासाठी कायमस्वरूपी क्रॉसिंगची मागणी दीर्घकाळ प्रलंबित होती. या मागणीचा पाठपुरावा सामाजिक कार्यकर्ते तानाजी देशमुख यांनी केला होता. त्यांच्या पाठपुराव्यास आमदार भोसले यांनी सक्रिय पाठबळ देत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर महामार्ग प्राधिकरणाने क्रॉसिंगस मंजुरी दिली आहे.

यावेळी बोलताना आमदार भोसले म्हणाले, “नागरिक, विद्यार्थी आणि व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन ही मागणी पूर्ण झाली आहे. या भागाला वेळेत सुविधा मिळाव्यात यासाठी तानाजी देशमुख यांचे प्रयत्न मोलाचे आहेत. या विभागातील विकासकामांसाठी मी सदैव प्रयत्नशील असून एकता मंडळ परिसरातील रस्ता व गटरसाठी २५ लाख रुपयांचा निधी जाहीर करत आहे.”

कार्यक्रमाला मलकापूर नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते हणमंतराव जाधव, सुरज शेवाळे, विजय देशमुख, शकिल मोमीन, शंकर सोनवले, औदुंबर सुरवसे, तुकाराम मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते.

सत्कार सोहळ्यात शकिल मोमीन, फारुख बागवान, नंदकुमार गायकवाड, राजेंद्र शिंगण, बबन वास्के, दस्तगीर काझी, किशोर नांगरे, विठ्ठल थोरात, असजद तिगडीकर, मल्लिकिर्जून करपे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

👉 शास्ञीनगर विभागातील नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीला न्याय मिळाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे.

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *