मेरी माता हायस्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (प्रतिनिधी) :
मेरी माता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, म्हसवड येथे मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा, उपक्रम व क्रीडा प्रोत्साहन संवाद यांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या व सध्या महाराष्ट्र शासनाच्या वर्ग एकच्या विशेष मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या कु. संस्कृती विकास मोरे यांची उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत क्रीडा हा केवळ खेळ नसून सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे, हे अधोरेखित केले.

संस्कृती मोरे यांनी खेळातून शारीरिक व मानसिक आरोग्य कसे सुदृढ राहते, तणावमुक्त जीवनशैली कशी घडते तसेच भविष्यातील घडामोडींवर क्रीडेचा कसा सकारात्मक परिणाम होतो याचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमानंतर त्यांनी विद्यार्थ्यांसमोर बुद्धिबळातील कौशल्याचे प्रात्यक्षिकही करून दाखवले.

या वेळी विद्यालयाचे प्राचार्य फादर सनू, जिजामाता पुरस्कार विजेत्या अश्विनी मोरे, सर्व शिक्षकवृंद व पत्रकार उपस्थित होते.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *