भाटकी ता. माण येथील श्री शंभू महादेव कुस्ती यात्रेत पै. सुरज मगर विजेता

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड:प्रतिनिधी
भाटकी (ता. माण) येथील ग्रामदैवत श्री शंभू महादेव कुस्ती यात्रा सोमवार, दि. 11 ऑगस्ट रोजी सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात पार पडली. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी मंदिरापाशी कुस्तीचे मोठे मैदान भरवण्यात आले होते.


यंदाच्या प्रमुख कुस्तीमध्ये स्व. सुयोग मच्छिंद्र शिर्के पाटील यांच्या स्मरणार्थ शिर्के पाटील कुटुंबियातर्फे प्रथम बक्षीस ५१ हजार रुपये ठेवण्यात आले होते. या कुस्तीमध्ये पै. विजय दोलताडे (श्रीराम कुस्ती संकुल, म्हसवड) – पै. महालिंग खांडेकर यांच्या पट्ट्यासमोर पै. सुरज मगर (गंगावेश तालीम, कोल्हापूर) – पै. विश्वास हरंगळे यांच्या पट्ट्याची लढत रंगली. ३० मिनिटांच्या अटीतटीच्या खेळानंतर गुणांच्या आधारे पै. सुरज मगर यांना विजयी घोषित करून बक्षीस प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचा शुभारंभ म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे, भाटकी गावचे सरपंच बापू चव्हाण, पंचायत समिती सदस्य गोरख शिर्के तात्या, पोलीस पाटील व यात्रा समिती सदस्यांच्या उपस्थितीत झाला. मैदानावर अनेक रंगतदार कुस्त्या रंगल्या.

कुस्ती व्यवस्थापनात वस्ताद सचिन नरळे (जांभुर्णी), वस्ताद महालिंग खांडेकर (श्रीराम संकुल, म्हसवड), वस्ताद पोपट रुपनवर (वीर हनुमान कुस्ती केंद्र, म्हसवड), वस्ताद शिवाजी दीडवाघ (दीडवाघवाडी) यांचा सहभाग होता. पंच म्हणून लक्ष्मण अहिवळे, सचिन शिर्के, नारायण कोडलकर, धनाजी कोडलकर आदींनी काम पाहिले.

या कार्यक्रमासाठी मराठा समन्वय संस्थेचे सोहम शिर्के विशेष उपस्थित होते. सूत्रसंचालन परशुराम पवार यांनी केले. अखेरीस “हर हर महादेव” च्या जयघोषात कुस्ती मैदान संपन्न झाले.

 

 

 

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *