विवेक वर्धिनी विद्यालय, पंढरपूर आठवी स्कॉलरशिप परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
अदनान कल्याणी
पंढरपूर प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाच्या वतीने फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक पूर्व व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (स्कॉलरशिप परीक्षा) विवेक वर्धिनी विद्यालय, पंढरपूरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या अथक मेहनतीने आणि गुरुजनांच्या कुशल मार्गदर्शनाने शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल कामगिरी बजावत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
या परीक्षेमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी आणि त्यांचे गुण पुढीलप्रमाणे आहेत:
पुजारी सिद्धांत सिताराम – १७० गुण
कु. देवकर वेदिका विनायक – १६८ गुण
जमादार रीफातनुरी मोहम्मदखुदबुद्दीन – १६४ गुण
कु. काळे जानवी सुरेश – १४८ गुण
खुळे ध्रुव बाळासाहेब – १३० गुण
या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासातील चिकाटी, सातत्य व जिद्दीच्या जोरावर उत्तम यश संपादन केले आहे. शाळेच्या इतिहासात स्कॉलरशिप परीक्षेतील यशाची नवी परंपरा निर्माण झाली असून, हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, तसेच संस्थेचे पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारे घवघवीत यश मिळवून शाळेचे आणि पालकांचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा सर्व स्तरांवरून दिल्या जात आहेत.