माण तालुक्यातील आठ गावांमध्ये जमावबंदी आदेश लागू : कालवा पाणी पळवण्याच्या घटनांमुळे कारवाई
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड प्रतिनिधी :
माण तालुक्यातील वळई, जांभुळणी, पुळकोटी, गंगोती, पानवन, देवापूर, पळसावडे आणि शिरताव या गावांमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कालव्यावरील पाणी पळवण्याच्या घटनांमुळे पाणी नियोजन बिघडत असल्याने आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता हा आदेश उपविभागीय दंडाधिकारी माण-खटाव यांनी जारी केला आहे.


