बिजवडी एसटी स्टँडवर सरकारी वाहनावर हल्ला; चालकाला कोयत्याने मारहाण

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
दहीवडी (ता. माण),
बिजवडी एसटी स्टँडवर एका शासकीय टँकरवरील चालकावर कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी चंद्रकांत तुळशीराम भोसले (रा. बिजवडी), याचे विरुद्ध दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी

दिनांक 11/04/2025 रोजी दुपारी 3.00 वा चे सुमारास मौजे बिजवडी तालुका माण गावचे हद्दीत दहिवडी ते फलटण जाणारे रोडवर बिजवडी एसटी स्टँड येथून अंकुश दादा खाडे (वय 35, रा. एनकूळ, ता. खटाव), हे सार्वजनिक बांधकाम विभागात चालक म्हणून कार्यरत आहेत. ते आपल्या ताब्यातील टाटा एस कंपनीच्या टँकर (MH 11 AB 8211) ने जात असताना, चंद्रकांत तुळशीराम भोसले (रा. बिजवडी) याला तुझी दुचाकी (MH 11 AX 8528) बाजूला घे म्हणून सांगितले असता चंद्रकांत भोसले याने तुझी आई बाजूने घाल अशी शिवीगाळ करून आपल्या मोटरसायकलच्या डिकीतील लोखंडी कोयता काढून चालकांच्या अंगावर धावून आला म्हणून चालक खाडे यांनी आपल्या ताब्यातील टँकरची काच वरती घेतली त्यावेळी त्याने शिवीगाळ करून कोयत्याने उजवे बाजूचे दरवाजाचे काचेवर मारून काच फोडली व टँकरवर येऊन खाडे याला खालीओढले व त्याच्या हातातील कोयता डावे दंडावर मारला म्हणून चंद्रकांत तुळशीराम भोसले, राहणार बिजवडी, तालुका माण , जिल्हा सातारा
याचेविरूदध चालक अंकुश खाडे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली

दहिवडी पोलीस ठाण्यात B.N.S. 2023 अंतर्गत कलम 118, 352, 324(4) व सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी चंद्रकांत भोसले याला दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतले., अधिक तपास सपोनि दत्तात्रय दराडे यांचे मार्गदर्शनाखाली पो.ह. बी.एस. खांडेकर (मो. 8408017838) करीत आहेत.

 

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!