दहिवडी पोलिसांची धडक कारवाई: पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार एस.टी. बसमधून जेरबंद
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला)
सादिक शेख सातारा
जिल्हा प्रतिनिधी
दहिवडी पोलिसांनी प्रभावी कारवाई करत वडूज पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.
वडूज पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक ५३/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता २०२३ चे कलम ११७ (२), ३५२ (२) (३), १२६ (२) अंतर्गत मनोजकुमार धनाजी घाडगे (वय २८, रा. वडूज, ता. खटाव) हा आरोपी पाहिजे होता. तो दहिवडी एस.टी. स्टँडवरून पुण्याला निघाल्याची गुप्त माहिती दहिवडी पोलिसांना मिळाली.
त्यानुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी पोलीस हवालदार विजय खाडे (ब.न. २२६२), सचिन वावरे (ब.न. २१२३) आणि पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुदळे (ब.न. २६६९) यांच्या सहकार्याने शिंगणापूर चौकात एस.टी. बस अडवून तपासणी केली असता आरोपी घाडगे सापडला. त्याला तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्यावर वडूज पोलीस स्टेशनला आधीपासूनच अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे निष्पन्न झाले.
पूर्वी दाखल गुन्हे:
गु.र.नं. १९१/२०२० – कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६, २७९, २७१, २६९, १८८, ३४, ५१बी
गु.र.नं. ३०/२२१ – कलम ३५४, ३२३, ५०४, ५०६, ५१०, ३४
गु.र.नं. १८४/२०२३ – कलम ४५२, ३२३, ५०४, ५०६, ५१०, ३४
गु.र.नं. २३५/२०२३ – कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६, ३४
गु.र.नं. २७४/२०२४ – कलम ११८ (२), ३५२, ३५१ (२) (३)
वरील गुन्ह्यांत विनयभंग, शासकीय कामात अडथळा आणि शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे समाविष्ट आहेत.
दहिवडी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तात्काळ योजना आखून आरोपीला अटक केली. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक मा. श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (दहिवडी विभाग) मा. अश्विनी शेंडगे यांनी दहिवडी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
ही धडक कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रभावीपणे पार पाडली. या कारवाईमुळे दहिवडी व परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा धाक निर्माण झाला आहे.