सपोनि भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त ३२५ दांत्यांकडून रक्तदान
म्हसवड ;
म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि राजकुमार भुजबळ यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला असून वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ३२५ दात्यांनी रेकॉर्ड ब्रेक रक्तदान केले. यावेळी विविध क्षेत्रातील हजारो लोकांनी वाढदिवसानिमित्त पोलीस ठाण्यात येऊन भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
माण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि राजकुमार भुजबळ यांच्या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसानिमित्त संघटनेने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. श्रीफळ वाढवून व फित कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस पाटलांसह म्हसवड व परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. आपल्या कामाची पद्धत आणी इतरांशी वर्तन यातुन थोड्याच दिवसात म्हसवडकर जनतेत लोकप्रिय झालेले सपोनि भुजबळ यांच्या आपुलकीच्या भावनेतून प्रत्येक जन आपल्या साहेबांचा वाढदिवस या भावनेतून उत्सफुर्त पणे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व रक्तदानासाठी मोठ्या संखेने उपस्थित झाले होते आजपर्यंत म्हसवड शहरात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये दीडशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले नव्हते. मात्र, सपोनि भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात पोलीस पाटील संघटनेच्या वतीने म्हसवड परिसरातील गावांत अनेक नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यामुळे सुमारे ३२५ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याने म्हसवड शहरातील आतापर्यंत झालेल्या रक्तदान शिबिरांमध्ये रेकॉर्ड ब्रेक झाला आहे. यावेळी नातेपुते येथील ब्लड बँक व मायणी येथील ब्लड बँक कर्मचाऱ्यांनी रक्त संकलन केले.