म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या वाढदिवसा निमित्त सात जानेवारी रोजी रक्तदान व वृक्षारोपण

बातमी Share करा:

म्हसवड: 
म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांचा वाढदिवस सात जानेवारी रोजी म्हसवड विभागातील पोलीस पाटील रक्तदान व वृक्षारोपण करून साजरा करणार असल्याची माहिती पोलीस पाटील संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
         म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा ७ जानेवारी रोजी वाढदिवस आहे हा वाढदिवस म्हसवड पोलीस ठाण्याच्या आवारात साजरा करण्याचे पोलीस पाटील संघटनेच्या वतीने ठरविण्यात आले असून हा वाढदिवस रक्तदान व वृक्षारोपण करून साजरा करण्यात येणार आहे.
          हा वाढदिवस साजरा करण्याच्या संदर्भात नुकतीच म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये म्हसवड विभागातील पोलीस पाटलांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून राजकुमार भुजबळ साहेब हे वर्दीतला देव माणूस आहे त्यांनी म्हसवड पोलीस ठाण्याचा चार्ज स्वीकारल्यापासून म्हसवड परिसरामध्ये कायदा सुव्यवस्थेचे काम अतिशय अचूक पणे  केले असून पोलीस हा माणसाचा शत्रू नसून तो मित्र आहे याचा प्रत्यय त्यांच्या कृतीतून प्रत्येक वेळी पोलीस ठाण्यात आलेल्या सर्वसामान्य माणसांना आलेला आहे त्यांनी आतापर्यंत पोलीस खात्यात आपली सेवा इमानी इतबारे केली असून त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे ते म्हसवडकर शहरवासीय व ग्रामीण भागातील जनतेच्या मनात  त्यांच्याबद्दल आदराचे स्थान निर्माण झाले आहे. गत ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पोलीस प्रशासन व पोलीस पाटील यांनी निवडणुका मध्ये कोणत्याही प्रकारचे वाद होऊ नये त्यासाठी प्रत्येक गावात म्हसवड पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस संचलन करण्यात आले होते.
             सदर बैठकीस मार्गदर्शन करताना सपोनि राजकुमार भुजबळ म्हणाले रक्तदान हे श्रेष्ठदान असून रक्तदानामुळे अनेक गरजूंचे प्राण वाचू शकतात  पोलीस पाटील यांचा उपक्रम स्तुत्य असून पर्यावरणासाठी वृक्षारोपणही आवश्यक असल्याचे सांगून पोलीस पाटील यांच्यामुळेच प्रत्येक गावातील माहिती पोलीस प्रशासनाला मिळत असल्याने त्याचा फायदा होत असून पोलीस पाटील हे अतिशय चांगले काम करत आहेत असे उद्गगारही भुजबळ यांनी काढले.
          या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास मानचिन्ह आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात येणार असून या रक्तदान शिबिरामध्ये म्हसवड परिसरातील विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते व तरुणांनी  रक्तदान करून सपोनि राजकुमार भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात असे आव्हान पोलीस पाटील संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!