गगनगिरी महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, उंब्रज. होली कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बारामती येथे पार पडलेल्या आठ जिल्ह्यांमध्ये झालेल्या इंग्लिश मीडियम स्टुडंट स्पोर्ट्स असोसिएशन मार्फत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामध्ये होली कॉन्व्हेंट इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन १४ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक मिळवला त्याचबरोबर १७ वर्षाखालील मुलांच्या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच या दोन्ही संघाची राष्ट्रीय फेडरेशन कप साठी निवड झाली आहे. त्यामुळे उंब्रज नगरीत होली कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूलच्या मानाच्या तुऱ्यात विद्यार्थ्यांनीआणखी एक भर पाडली आहे.
संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री पतंगराव माने (अण्णा), श्री. देवदत्त माने, मुख्याध्यापक जयदीप यादव सर, सौ. मनीषा साळुंखे मिस,ज्युनियर कॉलेज मुख्याध्यापक दमयंती जाधव मिस, क्रीडा शिक्षक श्री अंकुश माने सर, श्री पंकज यादव सर, आणि संस्थेचे सर्व शिक्षक आणि कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.