श्री संत नामदेव महाराज 674 वा समाधी संजीवन सोहळा या निमित्त कै. रामचंद्र हिरवे यांचे भाचे पद्मश्री पुरस्कार विजयते श्री मुरलीकांत राजाराम पेठकर सध्या रा. पुणे यांचा सत्कार कार्यक्रमाची ” इंजि सुनील पोरे यांचे हस्ते दीप प्रज्वलन” करून सुरुवात करण्यात आली
पद्मश्री पुरस्कार विजयते श्री मुरलीकांत राजाराम पेठकर यांचा शाल श्रीफळ व मानपत्र देऊन व त्यांच्या कार्याविषयी माहिती देऊन त्यांचा शिंपी समाज पेठ शिवापूर, श्री गजानन सेवा मंडळ, कै. के बी .मोरे. मोफत वाचनालय यांचे तर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात आला नासप चे जिल्हाध्यक्ष सुनील पोरे यांचे अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मोरणा विभागातील सर्व ग्रामस्थ सातारा जिल्ह्यातून आलेले नासपचे जिल्हाध्यक्ष श्री सुनील पोरे विजय चांडवले धनंजय कालेकर पुणे नासपचे सरचिटणीस श्री सुभाष मुळे व पाटणचे अध्यक्ष खांडके, श्रीकांत फुटाणे. औंधकर. आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी त्यांच्या जीवन कार्यावर “चंदू चॅम्पियन” हा चित्रपट प्रदर्शित झाला असून तो सध्या बॉक्स ऑफिसवर व पुणे येथे चित्रपट गृहात व मल्टीपर्पज हॉल येथे मोठ्या प्रमाणात चालत आहे. त्याचे स्टोरी व कथानक तरुण युवकांना प्रेरणा देणारे असून त्यांचे कार्य पुढच्या पिढीने आत्मसात करून आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी हा चित्रपट उपयोगात येणार असून आपलं भावी आयुष्य सुधारण्यासाठी या कार्यक्रमाचा निश्चितच फायदा होईल. चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी त्यांचा चिरंजीव अर्जुन उर्फ राहुल यांनी आपला संपूर्ण वेळ देऊन जुनी माहिती संग्रहित व गोळा करून देण्याचे काम केले .आणि त्याची पत्नी सौ.राखी पेटकर आणि त्याचे नातेसंबंध असणारे सर्व त्यांचे मामे भाऊ .मावस भाऊ. मावस बहिणी. हा गोतावळा आणि श्री किशोर हिरवे व गजानन फुटाणे सोपान काकडे नारायण औंधकर व भस्मे . फुटाणे. हिरवे काकडे. लंगडे चिपळूणचे अवसरे. हे सर्व नातेवाईक सर्व शिंपी समाज कार्यक्रमाला उपस्थित होते.
कवी व संपादक श्री जयंत लंगडे यांनी मानपत्राचे लेखन व सूत्रसंचालन करून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांनी मोरणा भागात आपल्या लहानपणी केलेल्या कार्याची माहिती दिली!आणि श्री संजय हिरवे यांनी प्रास्ताविक तर आभार प्रदर्शन शशिकांत प्रभाळे यांनी केले!