श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७४ व्या संजीवन सोहळ्यानिमित्त पेठशिवापूर येथे जिल्हाध्यक्ष सुनील पोरे, यांचे सह विविध मान्यवरांचा सत्कार सह दि. २७ जुलै ते २ ऑगस्ट रोजी अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. २७ जुलैपासून प्रवचन व किर्तनामध्ये हभप वसंतराव नाझरे, राजाराम मराठे, शशिकांत प्रभाळे, उत्तम माने, अरुण पवार, नथुराम यादव यांचे प्रवचन होणारआहे. तसेच हभप साक्षी सुर्वे, गणेश तिकुडवे, वैष्णवी ताई पप्पू महाराज नाडेकर, डोंगरे महाराज, राम महाराज राक्षे यांची कीर्तन सेवा होणार आहे. यामध्ये गजानन सेवा मंडळ पेठ शिवापूर, मोरगिरी भजनी मंडळ, कोकीसरे, आडदेव भजनी मंडळ, कुसरूळ मोरेवाडी भजनी मंडळ, आब्रग धावडे भजनी मंडळ, माऊली भजनी मंडळ मेंढोशी बीबी, यांचा कार्यक्रम होणार आहे.
गुरुवार दि. १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव तर शुक्रवार दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक होऊन सकाळी दहा वाजता कार्ल्याचे कीर्तन, हभप दत्तात्रय महाराज गाढवे यांचे होणार आहे. मंगळवार दि. ३० रोजी श्री संत नामदेव शिंपी समाज पेठ शिवापूर यांच्याकडून पद्मश्री पुरस्कार विजेते भारत सरकार मुरलीकांत पेटकर, जिल्हाध्यक्ष सुनील पोरे, अरुण काकडे, सुभाष मुळे, प्रकाश महाडिक यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.