म्हसवड येथे महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरी

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड

      म्हसवड येथे महात्मा फुले जयंती उत्सव मंडळाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली.

      तरुणांनी कटगुण येथून महात्मा फुले विचार ज्योत म्हसवडला आणली होती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथागत बुद्ध, मल्हारनगर येथील आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस माजी नगराध्यक्ष विजय धट यांनी पुष्पहार अर्पण करून ज्योतीचे स्वागत केले तेथून ज्योत फुले चौकात आल्यानंतर विविध मान्यवरांच्या हस्ते पुतळ्यास पुष्प अर्पण करण्यात आले.


         जयंतीनिमित्त महात्मा फुले यांच्या पुतळ्याची व परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली होती महात्मा फुले ते बसस्थानकपर्यंत दोन्ही बाजू लाईट, झेंडे लावून सजवण्यात आली होती

      दुपारी १२ वाजता चौकात ज्योत आल्यानंतर माजी नगराध्यक्ष विजय धट, सुरेश म्हेत्रे, निशांत पिसे,, चंद्रकांत केवटे, संतोष पिसे, बबडू अब्दागिरे, आकाश पिसे, आकाश मेंढापुरे, सुरेश तावरे बाळासाहेब पिसे, राजेंद्र पिसे, राजु डाके, कोले पंच, भारत लांब, आदी समाजबांधवांनी पुतळ्यास अभिवादन केले.

           सांयकाळी सात वाजता महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून ढोल ताशा व हलगीच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिलांची संख्या मोठी होती. मिरवणुकीत आ. जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे व चिरंजीव आदित्य गोरे यांनी या निमित्ताने म्हसवड येथील मिरवणुकीत सहभागी झाले होते. रात्री साडे नऊ वाजता मिरवणुकीचा समारोप करुन अन्नदान करण्यात आले.

    जयंतीनिमित्त दिवसभर महात्मा व फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट दाखवण्यात आला होता.

        महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त जयंती उत्सव समितीच्या वतीने बालाजी ब्लड बँक यांचे मार्फत रक्तदान शिबीर घेण्यात आले.

     महात्मा फुले यांना माजी नगराध्यक्ष नितीन जोशी, विजय • सिन्हा, पृथ्वीराज राजेमाने, करण – सिन्हा, अंगुली बनसोडे, तेजसिंह राजेमाने, किशोर सोनवणे, प्रमोद – लोखंडे आदीनी अभिवादन केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!