कराड तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल करवडी शाळेचा अनोखा उपक्रम………,.. …… सेंद्रिय शेती परसबाग यामुळे विद्यार्थी देतायेत विष मुक्त शेती संदेश..

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते
कराड :प्रतिनिधी

.. कराड तालुक्यातील करवडी येथील न्यू इंग्लिश स्कूल करवडी येथील विद्यार्थी विद्यार्थिनींनी यांनी परसबाग उपक्रम घेऊन उन्हाची तीव्रता जाणूनही विद्यार्थी कष्टाने परसबाग फुलवण्याचा प्रयत्न करतात त्याचबरोबर नैसर्गिक कलर कार्यशाळा घेऊन आपल्या परसबागेतील वनस्पती पासूनच किंवा परसबागेतील हळद रोजच्या वापरातील पदार्थापासून गोव्याच्या विवेकानंद पर्यावरण फौज सदस्य सूर्यकांत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नैसर्गिक कलर निर्मिती केली आहे

       या शाळेतील विद्यार्थिनी पूर्वा पिसाळ व तिच्या मित्र-मैत्रिणींनी नैसर्गिक कलर निर्मिती केली आहे याचबरोबर कृष्णा नदी चवळीच्या माध्यमातून कराड तालुक्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये नैसर्गिक कलर कार्यशाळा घेतली याचाच आदर्श ठेवून न्यू इंग्लिश स्कूल करवडी यांच्या विद्यार्थ्यांनी रासायनिक केमिकल मुक्त कलर रंग पंचमी साजरी करण्याचा निर्धार व्यक्त केला विद्यार्थी आपल्या परिसरातील झाडे जगवण्यासाठी अनेक प्रकारे कष्ट करीत आहेत

     सध्या कराड तालुक्यातील मसूर परिसरातील व करवडी येथील काही गावांना पाण्याची टंचाई जाणवत आहे यामुळे विद्यार्थ्यांनी साकारलेली परसबाग उपक्रम कराड तालुक्यातील चर्चेचा विषय बनला आहे या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक थोरात सर उपशिक्षिका विद्या चव्हाणप्रतीक्षा चव्हाण तनुजा मुल्ला.पानस्कर सर कांबळे मामा शाळेतील विद्यार्थी कृष्णा बचावचे राहुल पवार आबासाहेब चव्हाण विजय जगताप माधवी पवार विजय माने अशोक सुतार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे अशा उपक्रमाची गरज आहे अशी प्रतिक्रिया युवा नेते जसराज पाटील यांनी व्यक्त केली आहे


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!