शासकीय कामांना गती देण्याच्या दृष्टिकोनातून श्रीवर्धन येथे शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी संकल्पनेस आपण सुरुवात केली आहे.मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांची कामे अतिशय जलद गतीने पूर्णत्वास गेले की सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावरील हास्य अतिशय महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
श्रीवर्धन मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रांगणामध्ये शनिवारी संपन्न शासन आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रांताधिकारी महेश पाटील यांनी केले.महेश पाटील यांनी सन २०२३ मध्ये श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातील लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या लाभांची माहिती दिली.सदर प्रसंगी अदिती तटकरे यांनी शासन योजनांची उपस्थिताना माहिती देताना एकात्मिक बालविकास अंतर्गत माझी कन्या भाग्यश्री योजना,महसूल विभाग अंतर्गत संजय गांधी निराधार विधवा योजना,श्रावण बाळ योजना,डोमासिअल,जातीचा दाखला,उत्पन्नाचा दाखला,अंत्योदय कार्डधारक,तालुका कृषी कार्यालय अंतर्गत ब्रश कटर, फळबाग लागवड,शेततळे,फळ पिक विमा,पॅक हाऊस ,प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना चैन सॉ,ग्रामविकास विभाग अंतर्गत सौरदीप संच,ताडपत्री,सिंचन विहीर,बायोगॅस सयंत्र,पीठ गिरण,झेरॉक्स मशीन,बचत गटांना कर्ज वाटप,रमाई आवास योजना,जनमन आवास योजना,नगर विकास विभाग अंतर्गत दिव्यांग कल्याण निधी,पीएम स्वनिधी योजना आणि आरोग्य विभागा अंतर्गत आभा कार्डचे अदिती तटकरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.सदरचा कार्यक्रमाला विशेष कार्यकारी अधिकारी अमित शेडगे,प्रांताधिकारी महेश पाटील,तहसीलदार महेंद्र वाकलेकर,पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे,मुख्याधिकारी विराज लबडे,गटविकास अधिकारी गजानन लेंडी,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दर्शन विचारे,श्याम भोकरे व तालुक्यातील विविध लाभार्थी उपस्थित होते .