व्हिजन 24 तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
( उंब्रज) कराड :प्रतिनिधी
उंब्रज ता कराड गावचे माजी सरपंच आणि जेष्ट साहित्यिक दत्तात्रय श्रीपती जाधव(परवडकार आबा ) यांचे दि २०/२/२४ रोजी दुपारी २:३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी मुले व नातवंडे असा त्यांचा परिवार आहे सातारा जिल्ह्यात सर्वत्र परवडकार आबा अशी त्यांची एक स्वतंत्र अशी ओळख होती.उंब्रज हे नाव घेतले की आबा यांच नाव आपसूक तोंडावर येत असे. त्यांच्या निधनाने समाजात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रयत शिक्षण संस्थेचे ते जनरल बॉडी सदस्य ही होते.
ग्रामीण भागातील विध्यार्थी आणि विद्यार्थीनी यांना शिक्षणा साठी बाहेर जायला लागू नये या साठी उंब्रज मध्ये उच्च शिक्षणासाठी आज पर्यंत ज्या सोयी झाल्या यामध्ये आबा यांचा मोठा वाटा आहे,या पुढे आबा यांची उणीव सतत जाणवत राहील, हे नक्कीच त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी १0 वाजता उंब्रज स्मशाभूमीत होईल