लक्ष्मण मोहिते यांचा घुसमट’ कादंबरी साठी राज्यस्तरीय माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरकाराने सन्मान

बातमी Share करा:

व्हिजन 24 तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड

———————————————————-
            फलटण येथे साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय पर्यावरणस्नेही युवा स्पंदन साहित्य संमेलनात लक्ष्मण मोहिते यांना त्यांच्या ‘घुसमट’कादंबरी साठी राज्यस्तरीय माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरकाराने संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ विचारवंत मा प्राचार्य रवींद्र येवले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

           लक्ष्मण मोहिते यांचे आतापर्यंत ‘सर्वोत्तमता,मैत्री, माझ्या गावाची माणसं, गावकी व तू माझी होणार ना आदी ललित व कथा संग्रह आदी मराठी साहित्य प्रकाशित झाले आहे.त्याच बरोबर स्पर्धा परीक्षेसाठी ‘इंग्रजी ग्रामर व कंपोसिशन,आणि स्पोकन इंग्लिश स्किल्स आदी पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत.त्यांच्या ‘मेंढका’ कथानकास या पूर्वी भोरचा ‘सह्याद्री भूषण’ पुरस्कार मिळाला होता.त्यांच्या साहित्य लेखनात घुसमट ही कादंबरी एक वेगळ्या धाटणीची साहित्यकृती म्हणून ओळखली जाते.

             साहित्य संमेलन पुरस्कार वितरण प्रसंगी संमेलन अध्यक्ष जेष्ठ विचारवंत रवींद्र येवले यांच्या सह राज्य साहित्य मंडळ व संस्कृती मंडळ मुंबई सदस्य रवींद्र बेडकिहाळ,जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता विभागीय वन अधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे कृषी तज्ज्ञ सुगम शहा जत्राकार सुरेश शिंदे,जेष्ठ साहित्यिक आनंदा ननावरे,जेष्ठ कवी प्रदीप कांबळे पत्रकार प्रा रमेश आढाव,नियत वन क्षेत्र अधिकारी राहुल निकम व साहित्य संमेलनाचे आयोजक साहित्यिक ताराचंद आवळे आदी मान्यवर उपस्थित होती.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!