फलटणमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश; गोडसोली मैदान व जाधववाडीत उत्साहात वृक्षारोपण

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज

फलटण :प्रतिनिधी 

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रणरागिणी बहुउद्देशीय विकास संस्था, फलटण आणि माऊली फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गोडसोली क्रीडा मैदान व जाधववाडी येथे विविध प्रजातींच्या वृक्षांचे उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले.

या उपक्रमाचे उद्घाटन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते, तर प्रमुख उपस्थितीत अॅड. आळकुटे यांच्या उपस्थितीत झाले. माऊली फाउंडेशनने विविध प्रजातींची मोफत रोपे उपलब्ध करून दिल्यामुळे उपक्रमाला विशेष बळ मिळाले.

यावेळी मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य शेडगे सर, आर. बी. निंबाळकर, धुमाळ, सांगळे, क्रीडा शिक्षक गंगावणे सर, तसेच रणरागिणी संस्थेच्या अध्यक्षा सौ. रझिया शेख, संचालक आप्पा सायबू कापसे, सचिव मारुती टकले, उपाध्यक्ष अतुल शहा, प्रीती शहा, शाहीन शेख यांच्यासह माऊली फाउंडेशनचे रवींद्र साळुंखे, घडिया मॅडम, अतुलजी, संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करत अनेक वृक्षांची लागवड केली. गोडसोली मैदान आणि जाधववाडी परिसर हिरवागार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी रणरागिणी बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने सर्व मान्यवर, माऊली फाउंडेशनचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले. वृक्षसंवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *