दहा हजाराची लाच मागितल्या प्रकरणी फलटणच्या भुमी- अभिलेख विभागाच्या कनिष्ठ लिपीकास रंगेहाथ पकडले ; लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,सातारा यांची कारवाई

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
सादिक शेख
नाशिक पोलीस टाइम्स
सातारा जिल्हा प्रतिनिधी 

                  फलटण येथील   मुलाणी मोहम्मदशफी इब्राहीम , वय – ४९ वर्षे , पद – कनिष्ठ लिपीक , भुमी- अभिलेख, फलटण , जि. सातारा  वर्ग- 3,मुळ रा. – हिरवे बु।।, ता. जुन्नर जि. पुणे सध्या राहणार फ्लॅट नंबर 11 साई सहवास राजगुरुनगर वाडा रोड तालुका खेड जिल्हा पुणे यांनी  तक्रारदार यांचेकडे १०,००० रु. लाचेची  मागणी केली होती व त्यातील रक्कम रु. ७,०००/स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,सातारा यांनी  त्यांना रंगेहाथ पकडले

थोडक्यात हकीकत अशी

           यातील तक्रारदार यांचे मौजे कोरेगाव तालुका फलटण येथील वडिलोपार्जित एकत्रित असलेल्या गट नंबर 90 ची दि. १७/०१/२०२४ रोजी मोजणी करून सदर मोजणी हद्द  दि. 29/01/2024 रोजी कायम करण्याकरिता दहा हजार रुपये लाचीची मागणी करून त्यातील सात हजार रुपये रक्कम मौजे कोरेगाव ता. फलटण येथील तक्रारदार यांचे मोजणी गटाचे शेजारी स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडले असून आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. आरोपीचा  पुर्व इतिहास यापुर्वी आलेसे मुलाणी यांचेवर खेड पोलीस ठाणे गु.र. नंबर 114/2017 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 ,  (I)(d), 13 (2) दाखल आहे.

सापळा पथक: श्री. विक्रम शिवाजी पवार ,पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सातारा,पोहवा नितिन गोगावले ,पोहवा निलेश राजपुरे ,पो शि. विक्रम कणसे सर्व नेम – ला.प्र.वि. सातारा.पर्यवेक्षण अधिकारीश्री. राजेश वसंत वाघमारे, पोलिस उपअधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,सातारा. मार्गदर्शन अधिकारीश्री अमोल तांबे ,पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे परिक्षेत्र.श्री. विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे. या सर्व अधिकारी व त्यांचे पथक यांचे अभिनंदन जनतेतून होत आहे.

     *सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.*

      (राजेश वसंत वाघमारे) पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा. मो.क्र.-9763406500.   – 9594531100. ऑफिस-02162-238139 ईमेल – dyspacbsatara@mahapolice.gov.in Toll free no 1064


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!