श्री जानुबाई विद्यालय विरळी विद्यालयात तीन दिवसाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड :
विरळी तालुक माण येथील महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगलीचे श्री जानुबाई विद्यालय विरळी* विद्यालयात तीन दिवस चाललेले वार्षिक स्नेहसंमेलन विविध मनोरंजन कार्यक्रमाने उत्साहात संपन्न झाले
*पहिल्या दिवसाच्या स्नेहसंमेलनाची सुरुवात विविध वेशभूषा व कला दर्शनानेयुक्त शोभा यात्रेने झाली*प्रभात फेरीनंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री माने के. के.सर यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करून आंतरशालेय खो-खो, कबड्डी, वैयक्तिक खेळ, फनी गेम्सची सुरुवात झाली.*
*दुसऱ्या दिवशी सकाळी बाल बाजार व फूड फेस्टिवलचे आयोजनन करण्यात आले.या फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहानेे सहभाग घेतला.या बाजारात चिकन बिर्याणीला फार मोठी मागणी होती,सुमारे बारा हजार रुपयांची उलाढाल बाजार मध्ये झाली.विद्यार्थ्यांची विविध मार्केटिंग कौशल्य यावेळी दिसून आली.यानंतर राहिलेल्या फायनल मॅचेस व फनी गेम्स घेण्यात आले.


