माध्यमिक विभागाला मकर संक्रात सुट्टी नाही! महिला कर्मचारी नाराज, रजा घ्यावी लागणार!

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
विठ्ठलराव काटकर
कुकुडवाड( प्रतिनिधी )

       सातारा जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण विभागाने मकर संक्रातीच्या सुट्टीचा यादीत समावेश केला आहे, मात्र माध्यमिक शिक्षण विभागाने मकर संक्रातीच्या सुट्टीचा यादीत समावेश केलेला नसल्याने महिलाना रजा मांडावी लागणार आहे, त्यामुळे नाराजी व्यक्त होतं आहे.

              याबाबत अधिक माहिती अशी मकर संक्रात हा सण दरवर्षी १४ जानेवारी ला साजरा होतं असतो,मात्र यावर्षी मकर संक्रात हा सण १५ जानेवारीला साजरा होतं असून महिलांच्या दृष्टीने या सणाला अतिशय महत्वाच व पवित्र मानला जातो.या दिवशी महिला एकमेकांना वाण देण्या घेण्याचा व हळदी कुंकू कार्यक्रम केला जातो. प्रत्येक घरी पुरण पोळी चा बेत आयोजित केला जातो. मकर संक्रात प्रत्येक कुटूंबात अतिशय आनंदात साजरी होतं असते.

                     दरवर्षी मकर संक्रातीच्या निमित्ताने प्राथमिक व माध्यमिक शाळांना शासकीय सुट्टी दिली जाते. मात्र सन २०२३-२४ या   शैक्षणिक वर्षाच्या सुट्ट्याच्या यादीत प्राथमिक शिक्षण विभागाने प्राथमिक विभागाला सुट्टी दिली आहे परंतु माध्यमिक शिक्षण विभागाने चालू वर्षीच्या यादीतून मकर संक्रात ही सुट्टी दिलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे माध्यमिक शाळातील महिला शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.कारण मकर संक्रातीच्या सणदिवशी महिलांना रजा मांडावी लागणार आहे. दरवर्षी मकर संक्रात ही सुट्टी यादीत समावेशित केली जाते, मात्र चालू वर्षी मकर संक्रात सुट्टी माधमिक शिक्षण विभागाकडून वगळण्यात आली आहे.तरी दुसरी एक सुट्टी कमी करून मकर संक्रात या सुट्टीचा समावेश करावा अशी मागणी महिला शिक्षकांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्याकडे केली आहे.

चौकट :-मकर संक्रात हा सण महिलासाठी खुप महत्वाचा असून मकर संक्रातीच्या सुट्टीचा चालू वर्षी यादीत समावेश नसल्याने आम्हाला एक हक्काची रजा गमवावी लागणार आहे. तरी मकर संक्रात या सणाच्या सुट्टीचा स्वतंत्र आदेश शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी द्यावा अशी आमची मागणी आहे.

          महिला शिक्षका


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!