माण तालुक्यातील १३९ स्वस्त धान्य दुकानदार संपात सहभागी
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
माण तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी ३१डिसेंबर रोजीच ही पोस्ट मशीन तहसील कार्यालयात जमा करून एक जानेवारी रोजी होणाऱ्या संपात सहभाग नोंदवला आहे
एक जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात स्वस्त धान्य दुकानदार संघटनांनी रेशनिंग दुकानदारांच्या विविध अडचणी संदर्भात संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे
राज्यातील सुमारे ५५ हजार रेशनिंग दुकानदार संपामध्ये सहभागी झाले असून सातारा जिल्ह्यातील १७०७ तर माण तालुक्यातील १३९ स्वस्त धान्य दुकानदार संपात सहभागी झालेआहेत.
माण तालुका दुकानदार संघटनेचे अध्यक्ष भगवंत दादा गोरे यांनी माण तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपात सहभागी होण्याचे आवाहन केले होते त्या आव्हानाला पाठिंबा देत संघटनेचे सचिव दादासाहेब काळे यांनी ३१ डिसेंबर रोजी ही पोस्ट मशीन तहसील कार्यालयामध्ये जमा करून संपाला पाठिंबा व्यक्त केला आहे.

शासन जोपर्यंत स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत स्वस्त धान्य दुकानदार नूतन वर्षांमध्ये अन्नधान्याची वाटप करणार नसल्याचे अगोदरच निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे
एक जानेवारी रोजी संप सुरू झालाअसल्याने रेशनिंग वर अवलंबून असलेल्या सर्वसामान्य गोरगरीब जिंदगीत मजूर आधी अन्नसुरक्षा योजनेतील कार्डधारकांची गरज असून अन्नसुरक्षा योजनेत शासनाने अन्नधान्य पुरवठा करण्याची लोकांची हमी घेतली असल्याने यावर कसा तोडगा काढणार याकडे स्वस्त धान्य दुकानदार यांचे लक्ष लागून राहिले आहे.