गोंदवले खुर्द येथे बालविवाह प्रकरणी पाच जणावर गुन्हा दाखल

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
दहिवडी
गोंदवले खुर्द तालुका माण येथील विश्व छाया मंगल कार्यालयात अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्यात येत असल्याची खबर दहिवडी पोलीसांना मिळताच दहिवडी पोलीसांनी छापा मारुन पाच जणावर गुन्हा दाखल केला 
या बाबत दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी  गोंदवले खुर्द येथील विश्वछाया मंगल कार्यालयात दि १५ रोजी एका १६ वर्ष वयाच्या  अल्पवयीन मुलीचे ती अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही तिचे नातेवाईक
1) श्रीमती अनिता संतोष साठे राहणार बोरगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर 2) अजिंक्य आप्पा अवघडे वय२५ वर्ष 3) सौ उषा  आप्पा अवघडे 4) किसन आप्पा अवघडे  5) नारायण कुलकर्णी पूर्ण नाव माहित नाही अनुक्रमांक दोन ते चार सर्व राहणार गोंदवले खुर्द ता. माण जिल्हा सातारा यांनी तिचे लग्न लावून दिले आहे म्हणून  त्यांच्याविरुद्ध  दहिवडी पोलीस ठाण्यात  कायदेशीर तक्रार दिली त्यानुसारवरील पाच जणावर  दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.विरकर करत आहेत

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!