गोंदवले खुर्द येथे दुचाकीने दिलेल्या धडकेत एक जण ठार 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )

 म्हसवड –
गोंदवले खुर्द येथे लातूर सातारा महामार्गावर दुचाकीने धडक दिल्याने एक जण ठार झाल्याची दुदैवी घटना घडली. गोंदवले खुर्द येथील एसटी स्टँडवर मंगळवारी रात्री दुचाकीने धडक देऊन वसंत कृष्णा कदम वय 75 यांचं निधन झालं आणि या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला
        सदर अपघाताची नोंद दहिवडी पोलीस स्टेशनला झालेली आहे घटनास्थळावरून आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोंदवले खुर्द येथील एसटी स्टँडवर हॉटेल चेतना समोर रात्री पावणे सात वाजण्याच्या सुमारास वसंत कृष्णा कदम रानातून काम करून घरी चालले असताना गोंदवले बुद्रुक बाजू कडून गणेश श्रीराम मेहत्रे राहणार म्हसवड यांच्या दुचाकीची जोराची धडक बसली त्यात कदम रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या गटारावर जाऊन पडले त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला त्यांना तात्काळ गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं दाखल केल्यानंतर डॉक्टर उपलब्ध नसल्याने वैद्यकीय सेवा तत्काळ मिळाली नाही.असा आरोप नातेवाईकांनी केला. यानंतर गावातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप पोळ यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्वतः जखमी कदम यांच्या डोक्याला टाके घातले व पुढील उपचारासाठी दोन्ही जखमींना सातार कडे पाठवण्यात आलं मात्र कदम यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा रक्तस्त्राव थांबत नव्हता काही अंतर गेल्यावर कदम मयत झाले सदर घटनेची फिर्याद कैलास बापूराव कदम यांनी दिली आहे गुन्हा नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल झाला असून अधिक तपास सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली विठ्ठल वीरकर करत आहेत.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!