म्हसवड शहरात कडकडीत बंद 

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड 
    जालना घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असताना म्हसवड शहरात ही या घटनेचा निषेध म्हणुन पुकारण्यात आलेल्या म्हसवड बंद ला म्हसवडकरांनी उत्फुर्तपणे पाठींबा देऊन शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दोन दिवसांपुर्वी जालना येथे मराठा समाजाने सुरु केलेल्या आंदोलनाला पोलीसांकडुन हिंसक वळण लावण्यात आल्याने आंदोलना दरम्यान पोलीस अन् आंदोलक यांच्यामध्ये तीव्र संघर्ष झाला त्यामुळे पोलीसांकडुन आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला, तर आंदोलकांकडुनही पोलीसी अत्याचारा विरोधात दगडफेक करण्यात आली यामध्ये आंदोलक व पोलीस असे दोन्हीही जखमी झाल्याचे चित्र आहे. या घटनेचे पडसाद मात्र संपूर्ण राज्यात उमटताना दिसत असुन आंदोलनाला पाठींबा व पोलीसांचा निषेध म्हणुन राज्यभरातील मराठा समाज  एकवटल्याचे दृष्य आहे. या समाजाकडुन राज्यभरात ठिकठिकाणी मोर्चे निघत असतानाच दि. 3 रोजी सातारा येथेही या समाजाने बैठक घेत दि. 4 रोजी संपूर्ण सातारा जिल्हा बंद ची हाक दिली, या हाकेला माण तालुक्यातील अनेक गावांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पहावयास मिळाले. माण तालुक्यात सर्वात मोठे शहर म्हणुन म्हसवड शहराची ओळख आहे या शहरातही मराठा समाज बांधवांनी दि. 4 रोजी बंद ची हाक दिली होती त्या हाकेला म्हसवडकरांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन सोमवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला, या बंद मध्ये शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहिल्याने शहराचे मुख्य रस्ते ओस पडल्याचे दिसुन आले, तर म्हसवडकरांनीही बंद मध्ये सहभागी होत जालना घटनेचा निषेध व्यक्त केला.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!