शेनवडीचा तलाठी लाचप्रकरणी जाळ्यात फेरफारमध्ये नावांच्या नोंदीसाठी ११ हजारांची मागणी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड,  :
  न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीच्या फेरफारमध्ये नावांची नोंद करण्यासाठी ११ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून नऊ हजार रुपये प्रत्यक्ष स्वीकारताना शेनवडी (ता. माण) येथील तलाठी तुकाराम शामराव नरळे (वय ३०, रा. पानवण, ता. माण) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी, की महिला तक्रारदार यांच्या चुलत सासऱ्याच्या शेनवडी (ता. माण) येथील साडेतेरा एकर जमिनीचा म्हसवड न्यायालयात हुकूमनाम्याचा आदेश होऊन साडेतेरा एकर जमीन तक्रारदार यांच्या पती व दिराच्या नावावर करण्याचे आदेश न्यायालयाने
दिला होते. न्यायालयाच्या या आदेशानुसार जमिनीच्या फेरफारमध्ये नोंद करण्यासाठी शेनवडीचे तलाठी तुकाराम शामराव नरळे यांनी तक्रारदार यांच्याकडे ११ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती नऊ हजार रुपये देण्याचे कबूल केले. त्यानुसार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला.
उद्यमनगर नजीक  माळशिरस चौकात    नऊ हजारांची लाच स्वीकारताना तलाठी नरळे यांना पकडण्यात आले. हा सापळा पोलिस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांच्या नेतृत्वाखाली नीलेश चव्हाण, प्रशांत नलावडे, तुषार भोसले, मारुती अडागळे यांनी यशस्वी केला.
पैसे मागितल्यास संपर्क साधा…..
■ शासकीय अधिकारी व कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी तत्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क करावा, असे आवाहन उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांनी केले आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!