म्हसवड पोलीस ठाण्याला  सर्वोत्कृष्ट प्रकटीकरण पुरस्कार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड 
                 म्हसवड पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी सातारा जिल्हयात सर्वोत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा यांनी म्हसवड पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट प्रकटीकरण  ( BEST DETECTION OF THE MONTH )पुरस्कार देऊन  सन्मानित केले      
माहे मे २०२३ मध्ये म्हसवड पोलीस ठाणे गु.र.नं. १५५/२०२३ भा.द.वि.स.क ४२०, ४६८, ४७१, ४१७,३७९, १२०(ब), ३४ सह आय.टी. अॅक्ट क. ६५,६६ (क),६६ (ड) या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध तांत्रीक माहीतीचे आधारे घेऊन आरोपीना उत्तर प्रदेश राज्यातुन अटक करून त्यांच्याकडे सखोल तपास करुन आरोपींना फसवणुक केलेली रक्कम बँकांना पत्र व्यवहार करुन एकूण १,२५,०००,०००/- रक्कम गोठविण्यात आली तसेच आरोपींनी गुन्हा करतेवेळी वापरलेली एटीएम कार्डस् जप्त केली तसेच गुन्ह्यातील गेलेल्या रक्कमे पैकी एकूण ९७ लाख रु. हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणून संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याबद्दल समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा यांचेकडून       म्हसवड पोलीस ठाणेचे अधिकारी व अंमलदार यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले असून . आपण भविष्यातही अशीच कामगिरी कराल अशी अपेक्षा ही समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा यांनी व्यक्त केली आहे

 

   अशा प्रकारच्या पुरस्काराने म्हसवड पोलीस ठाणे सन्मानित होने ही म्हसवडच्या इतिहासातील पहिलीच वेळ असल्याने म्हसवडकर नागरीकाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!