समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांच्या संकल्पनेतून उंच भरारी योजने अंतर्गत त्रिसुत्री कार्यक्रम

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
सादिक शेख (पोलीस टाइम्स रिपोर्टर )
गोंदवले खुर्द:
सातारा जिल्हयातील अशी ठिकाणे जेथे युवकांमध्ये योग्य मार्गदर्शन, संधी व साधनांअभावी किरकोळ स्वरुपाचे गुन्हे दाखल होण्याचे प्रकार होतात अशा क्षेत्रातील युवकांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करुन त्यांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी समुपदेशन, मानसोपचार, शिक्षण, कौशल्य विकास, खेळ, रोजगार अशा तरतुदी करणेसाठी मा.. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांच्या संकल्पनेतून उंच भरारी योजने अंतर्गत त्रिसुत्री कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
   त्यातील पहीला टप्पा कौशल्य विकास व नोकऱ्या (रोजगार) सुरु असुन त्यामध्ये सातारा जिल्हयातील १५ ते २५ या वयोगटातील युवक व त्यांचे पालक यांचेशी संवाद साधुन त्यांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करुन देणे, तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार. सातारा जिल्हयामध्ये फेब्रुवारी व मार्च २०२३ मध्ये सातारा, सातारा ग्रामिण (कोरेगाव), वाई कराड,फलटण, पाटण या उपविभागामध्ये उपविभागीय स्तरावर युवकांना बोलावुन त्यांना . प्रशांत पाटील, संचालक, आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI), मेधावी स्किल युनिव्हर्सिटी यांचे प्रवेश सल्लागार . राकेश कांबळे, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे भोर विभागाचे केंद्र प्रमुख . योगेश गरुड तसेच माणदेशी फाऊंडेशनचे प्रतिनिधी ओंकार गोंजारी यांनी त्यांचे कडील कोर्सेसची सविस्तर माहीती देवुन व्यवसाय व रोजगार मिळणेबाबत एकुण ५४७/- युवक व युवतींना मार्गदर्शन केले आहे.
      उंच भरारी योजने अंतर्गत आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) सातारा यांचे माध्यमातुन दिनांक १५/०५/२०२३ ते २४/०५/२०२३ या कालावधीमध्ये आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) सातारा या ठिकाणी युवकांना फास्ट फुड उदयोग या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
          सदर युवकांचे प्रशिक्षण पुर्ण झाले असुन त्यांना दिनांक २४/०५/२०२३ रोजी आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) सातारा येथे आयोजीत समारोप समारंभावेळी मा. पोलीस अधीक्षक सातारा यांचेतर्फे सदर युवकांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. उंच भरारी योजनेअंतर्गत एकुण ३ युवकांनी सदर प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदविला होता.
       उंच भरारी योजने अंतर्गत सातारा जिल्हा पोलीस व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन प्रशिक्षण संस्था सातारा यांचे संयुक्त विद्यमानाने १. दुचाकी रिपेअरिंग/मॅकेनीकल, २. हॉटेल मॅनेजमेंट व ३. असिस्टंट इलेक्ट्रीशियन या कोर्सचे प्रशिक्षणाकरीता सातारा जिल्हयातुन उंच भरारीचे माध्यमातुन कोल्हापूर, भोर, अहमदनगर या ठिकाणी एकुण ३४ प्रशिक्षणार्थींना पाठविण्यात आले असुन मार्च २०२३ मध्ये १० युवकांना तारा रिलेज प्रायव्हेट लि. खेड शिवापूर पुणे या कंपनीत टर्नन / इलेक्ट्रिशन फ्लेक्सी आयटीआय चे प्रशिक्षणाकरीता रवाना करण्यात आले आहे.
उंच भरारी योजनेतुन एकुण ४७ युवकांना प्रशिक्षण व नोकरी करीता पाठविण्यात आलेले आहेत. तसेच या योजनेत झालेल्या इतर युवकांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार तसेच त्यांना स्वत:च्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *