नामदेव समाजोन्नती परिषदेच्या झेंड्याखाली संघटित राहून आपला विकास साधावा :इंजि.सुनील पोरे
व्हिजन २४ तास (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
स्वातंत्र्यपूर्व काळात सन-१९०७मध्ये नामदेव शिंपी समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या नामदेव समाजोन्नती परिषदेच्या झेंड्याखाली संघटित राहून आपला विकास साधावा असे आव्हान नामदेव समाजन्नती परिषदेचे जिल्हा अध्यक्ष इंजि.सुनील पोरे यांनी केले
कोरेगाव येथील नामदेव मंदिरामध्ये शिंपी बांधवांची बैठक झाली या बैठकीत इंजि.सुनील पोरे बोलत होते. यावेळी रामभाऊ मुळे, रवींद्र भस्मे, योगेश मुळे,सागर बाचल, पोरे,भुतकर, वेल्हाळ,भांबुरे, राजेंद्र धोंगडे ,अविनाश खटावकर ,चंद्रकांत पोरे अतुल फुटाणे नामदेव चांडवले विजय चांडोले आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजातील सर्व विद्यार्थ्यांनी पुढे बोलताना पोरे म्हणाले शिंपी समाजाची उन्नती करायची असेल तर शिक्षणावर भर देणे काळाची गरज आहे.एकमेकांनानोकरी-व्यवसायासाठी सर्व ती मदत करायची. आहे.आपले सर्वाचे जुने मतभेद वाद असेल ते विसरायचे आहेत.सर्व आपल्या शिंपी समाजाच्या असलेल्या संघटना ,संस्था यामध्ये जमेल इतके सामाजिक काम करायचे आहेत.वर्तमान पञ वाचण्याची सवय लावून घ्यायची आहे.श्री संत नामदेव महाराजाचा फोटो आपल्या घरी भिंतीवर लावायचा आहे.भावांसोबत चांगल राहायच आहे. सर्वांना सोबत घेत प्रगती करायची आहे.एकमेकांना भेटल्यावर “जय नामदेव ” म्हणायचे आहे.फक्त मरणदारी आणि तोरणदारी एकत्र न येता दर महिन्याला ठराविक ठिकाणी एकञ येऊन विचार विनिमय करायचा एकमेकास सहाय्य करु आवघे धरु सुपंथ हा मंञ ध्यानात ठेवायचा गुण दोषासह एकमेकांना स्विकारायचे आहे.समाजाचा उपयोग आपल्या स्वार्थसाठी करायचा नाही.विज्ञानाची कास धरायची खोट्या प्रतिष्ठेच्या नांदी लागायचे नाही.समाजाच्या हिताचे जे जे असेल ते ते मान्य करायचे समाजापेक्षा स्वतःला मोठे समजायचे नाही.समाज आहे म्हणून आपण आहोत हे नेहमी लक्षात ठेवावे .हा संदेश जास्तीत जास्त समाजबांधवा पर्यत पोहचवावा असे आव्हान पोरे यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना राजेश खटावकर यांनी केली स्वागत ऍड. अमोल भुतकर तर आभार संदीप शेठ धोंगडे यांनी मानले.