स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची अफलातून कारवाई. दरोडा टाकण्याचे तयारीमध्ये असलेल्या पोलीस अभिलेखावरील १० आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडून ९ लाख ११ हजार ९०० रुपये किमतीच्या १४ देशी बनावटीच्या पिस्टल व २२ जिवंत काडतुसे जप्त.
व्हिजन २४ तास न्यूज म्हसवड(संपादक:अहमद मुल्ला )
By:सादिक शेख ( पोलीस टाईम्स रिपोर्टर)
गोंदवले खुर्द:
श्री.समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्हयातील बेकायदा अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढून त्यांचेवर प्रभावी कारवाई करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या आहेत. त्या अनुशंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करुन त्यांना अवैध अग्निशस्त्राच्या कारवाया करण्याचे आदेश दिले आहेत.
दि.२८/०३/२०२३ रोजी परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अजय कोकाटे, पोलीस निरीक्षक अरुण देवकर व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार असे कराड शहरात कोंबींग ऑपरेशन राबवित असताना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, मौजे राजमाची ता कराड गावचे हद्दीत कराड ते विटा जाणारे रोडवर जानाई मळाई मंदिराजवळ, रस्त्याचे बाजूला असलेल्या उसाच्या शेताच्या जवळ काही इसम जमले असून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत. अशी माहिती मिळाल्याने त्यांनी त्यांचे अधिपत्याखालील पथकास याबाबत माहिती देवुन वरील सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार असे २ पंचांसह प्राप्त आहितीच्या ठिकाणी लगेच रवाना झाले. नमुद ठिकाणी आल्यानंतर पथकास उसाच्या शेतालगत आडोशास सुमारे ८ ते १० इसम उभे असल्याचे दिसले. आरोपी नामे :
१) सनी उर्फ गणेश शिंदे रा. ओगलेवाडी ता. कराड जि. सातारा २) अमित हणमंत कदम रा. अंतवडी ता. कराड जि. सातारा ३) अखिलेश सुरज नलवडे रा. गजानन हौसिंग सोसायटी कराड ४) धनंजय मारुती वाटकर रा.सैदापूर कराड ५) वाहीद बाबासाो मुल्ला रा. विंग ता. कराड जि. सातारा ६) रिजवान रज्जाक नदाफ रा. मलकापूर कराड ७) चेतन शाम देवकुळे रा. बुधवार पेठ महात्मा फुलेनगर कराड ८) बजरंग सुरेश माने रा. बुधवार पेठ कराड ९) हर्ष अनिल चंदवाणी रा. मलकापूर कराड १०) तुषार पांडूरंग शिखरे रा. हजारमाची कराड नमुद इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची चाहुल लागताच ते पळून जाण्याचा प्रयत्नात असताना पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नमुद इसमांना ताब्यात घेवून त्यांचे कब्जातून ९ लाख ११ हजार ९०० रुपये किमतीच्या १४ देशी बनावटीच्या पिस्टल व २२ जिवंत काडतुसे, मिरची पुड, कोयता असा मुद्देमाल जप्त केला असून त्यांचे विरुध्द कराड शहर पोलीस ठाणेस दरोडा टाकण्याचे पुर्व तयारीचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.
श्री.समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री. रणजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड यांचे सूचनाप्रमाणे व श्री. अजय कोकाटे परि.पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक भगवानराव पाटील, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, उदय दळवी, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, तानाजी माने, अतिश घाडगे, संतोष पवार, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष
सपकाळ, शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमोल माने, गुनीर मुल्ला, शिवाजी भिसे, निलेश काटकर, मोहन पवार, प्रविण कांबळे, गणेश कापरे, रोहित निकम, विशाल पवार,प्रविण पवार, वैभव सावंत, गणेश ससाणे, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन, धीरज महाडीक, पृथ्वीराज जाधव, कापरे, संभाजी साळूंखे, पंकज बेसके, येळवे, कुलदिप कोळी, अमित वाघमारे, सज्जन जगताप,निकम, सागर बर्गे यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.