विरोधकांच्या सर्व आयुधावर मात ,२३ वर्षांच्या न्यायालयीन लढ्याला अखेर यश, मायणी तील अनंत इंग्लिश स्कूललाअनुदान प्राप्त ; डॉ. दिलीपराव येळगावकर
व्हिजन २४ तास न्यूज
BY ;Ahmad Mulla
म्हसवड ;
२३ वर्षांच्या न्यायालयीन लढ्याला अखेर यश मिळून, विरोधकांच्या सर्व आयुधावर मात करुन मायणी तील अनंत इंग्लिश स्कूल अनुदान प्राप्त झाले असे उद् गार मा. आ. डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी सद्गुरू सरुताई मठात झालेल्या सत्कार प्रसंगी काढले.
याप्रसंगी डॉ.सौ. उर्मिला येळगावकर, संचालिका रेणू येळगावकर, पल्लवी गुदगे, कार्याध्यक्ष राजाराम कचरे, उपाध्यक्ष दिलीप पुस्तके, इन्नुस जमादार, संस्थापक सचिव पांडुरंग तारळेकर, माजी सचिव हिम्मतराव माने, ट्रस्टचे सचिव रविंद्रशेठ बाबर, संचालक जालिंदर माळी, विजयराव कवडे, अंकुशराव रजपूत, नितीन झोडगे, सूरज पाटील, आबासाहेब देशमुख, मानसिंगराव देशमुख, जनार्दन देशमुख, आनंदराव शेवाळे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्लोक उदयकुमार वरुडे याची नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन परेडसाठी महाराष्ट्रातून निवड झाली त्या बद्दल डॉ. येळगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. म्हणाले, कोणतीही गोष्ट मी मनावर घेतली तर ती मी पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही. अनंत इंग्लिश स्कूल ला अनुदान प्राप्त करण्यासाठी अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. अखेर माझ्या प्रयत्नास यश आले व न्यायालयाने योग्य न्याय दिला. याचा आम्हा सर्वांना खूप आनंद होत आहे. माझ्या बरोबर असणाऱ्या साथीदारानीही मला मोलाची साथ दिली. असे सांगून आपण शाळा का स्थापन केली ते सांगितले. त्यावेळी काही विद्यार्थ्यांवर दुसऱ्या शाळेत अन्यायकारक प्रसंग ओढवले, त्यामुळे आपण नवीन शाळा काढण्याचा निर्णय घेतला व तो तडीस नेला. याबाबत मी समाधानी आहे.माझ्या शाळेतील विद्यार्थी सर्व गुण संपन्न झाला पाहिजे. नुसती पोपटपंची नको. माझ्या शाळेतील विद्यार्थी उत्कृष्ट कलाकार, खेळाडू बनला पाहिजे. आई- वडिलांना अनाथ आश्रमात ठेवणारा विद्यार्थी मला निर्माण करायचा नाही, असे ते म्हणाले.
यावेळी पांडुरंग तारळेकर, दिलीप पुस्तके, रेणू येळगावकर, राजाराम कचरे, किरण जाधव यांचीही भाषणे झाली.
यावेळी अनंत इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक सुनिल यलमर व दिपक खलीपे यांचाही सत्कार डॉ. येळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बरकत शेख यांनी तर आभार विजया सुगदरे यांनी मानले.