मुंबई येथून रिक्षा चोरुन, म्हसवड मध्ये फिरवणारा चोरटा, तीन रिक्षासह ताब्यात
व्हिजन२४ तास न्यूज
BY अहमद मुल्ला
म्हसवड
म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील कुकूडवाड गावातील माणिकराव सुखदेव तुपे हा प्रत्येक महिन्याला दोन महिन्याला नविन रिक्षा आणुन तो फिरवत असे, सदरचीबाबत म्हसवड पोलीसांच्या करड्या नजरेला रुचत नव्हती. सदरबाबत सपोनि / श्री. भुजबळ यांनी आपले स्टाफ सोबत चर्चा करून माणिकराव तुपे यांची माहीती घेण्यास सांगितले, त्यावेळी तपासाची चक्र फिरू लागली आणि माणिकराव तुपे हा मुंबई येथून चोरून रिक्षा घेवून येवून त्या विकत असल्याची गोपनिय बातमी माहीती काढुन माणिकराव तुपे यांस ताब्यात घेवून त्यांचेकडे वापरत असलेला रिक्षा नंबर नंबर MH- 04- KA- 1505 हा ताब्यात घेतला सदरचे रिक्षाचे मालकीचे कागदपत्रांबाबत माहीती घेतली असता कोणतीही माहीती व समाधानकारक उत्तर न दिल्याने तसेच त्याचे ताब्यात असलेल्या मालाबाबतचे कोणतेही कागदपत्री पुरावा सादर न केल्याने त्यांचे विरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करुन सदर गुन्ह्यांचा पुढील तपास करण्याची मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, म्हसवड यांचेकडुन परवानगी घेवून तपास सुरू केला.
सदर गुन्ह्यांचे तपासात आरोपी यांचेकडे कसून तपास केला असता आरोपी यांचे ताब्यात आणखी दोन रिक्षा चोरुन आणल्याचे उघड झाले आरोपी याने चोरी केलेले तीनही अॅटो रिक्षा १) MH-04-KA-1505 २) MH 11 CJ 7876 व ३) MH-11-H- 8924 किंमत २,५०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल तपासकामी जप्त केला.
सदरची कामगिरी मा. श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा, श्री. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, व श्री. गणेश केंद्र, उपविभागीय पोलीस अधिकारी, कोरेंगांव उपविभाग, कोरेगांव पद्भार दहिवडी विभाग, दहिवडी यांचे मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. राजकुमार भुजबळ, सहा. पोलीस निरीक्षक, विशाल भंडारे, पोलीस उपनिरीक्षक, व अमलदार नंदकुमार खाडे, देवानंद खाडे, शिवाजी जाधव, अमर नारनवर, किरण चव्हाण, नितीन निकम, सुरज काकडे, अनिल वाघमोडे, नवनाथ शिरकुळे, सतिष जाधव, यांनी केली असुन कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अमलदार यांचे पोलीस अधीक्षक, सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अभिनंद केले.