दहिवडीत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई विनानंबर प्लेट, ट्रिपल सीट व फॅन्सी नंबरप्लेट वाहनांवर कारवाई; ४४ प्रकरणांत ४१ हजारांचा दंड

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज

दहिवडी, दि. ११ : (प्रतिनिधी 

दहिवडी शहरात वाढते अपघात व बेशिस्त वाहनचालकांना आळा घालण्यासाठी दहिवडी पोलिसांनी विशेष वाहतूक मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. आठवडा बाजाराच्या पार्श्वभूमीवर फलटण चौक येथे राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ४४ प्रकरणे दाखल करून एकूण ४१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघातांचे तसेच बेशिस्त वाहन चालविण्याचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून फलटण चौक येथे विनानंबर प्लेट, ट्रिपल सीट, फॅन्सी नंबरप्लेट तसेच विनापरवाना वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस हवालदार रविंद्र खाडे, तानाजी काळेल, विजय खाडे, संभाजी खाडे, महिला पोलीस हवालदार दया डोईफोडे, तनुजा खाडे, ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबल सहदेव साबळे, गणेश खाडे, सागर लोखंडे, चंद्रकांत हांगे, पोलीस कॉन्स्टेबल किरण सजगणे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुवर्णा काळे, प्रियंका दुबळे व स्नेहल पवार यांनी सहभाग घेतला.

वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःसह इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन दहिवडी पोलिसांनी केले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *