म्हसवड नगरपरिषदेच्या वतीने १३ ऑगस्टला तिरंगा रॅली

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड : प्रतिनिधी

    ‘ हर घर तिरंगा-२०२६’ अभियानांतर्गत नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्याबरोबरच राष्ट्रध्वजाबाबत जनजागृती करण्यासाठी म्हसवड नगरपरिषदेच्या वतीने गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही रॅली म्हसवड नगरपरिषद कार्यालयातून सुरू होऊन एस.टी. स्टँड, मेन पेठ, सातारा-पंढरपूर रोड मार्गे सिद्धनाथ मंदिर येथे जाईल व त्यानंतर पुन्हा म्हसवड नगरपरिषद कार्यालय येथे सांगता होईल.

या रॅलीत शहरातील शाळा व महाविद्यालयांतील मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे. सहभागी होणाऱ्यांनी सकाळी ८.१५ वाजता नगरपरिषद कार्यालयात उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी सर्व संबंधित शैक्षणिक संस्थांनी आवश्यक ती कार्यवाही करून तिरंगा रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे कळविले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *