फॅन्सी नंबर प्लेट व कर्णकर्कश सायलेंसरधारकांवर दहिवडी पोलिसांचा दणका तीन दिवसांत ४७ वाहनचालकांवर कारवाई; ₹३६,५०० दंड वसूल

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

दहिवडी | प्रतिनिधी

दहिवडी शहरात फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणारे सायलेंसर तसेच विना सीटबेल्ट वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात दहिवडी पोलिसांनी विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली. या मोहिमेत तीन दिवसांत ४७ वाहनचालकांवर कारवाई करून एकूण ३६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीत वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर १ ते ३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत फलटण चौक व एसटी स्टँड परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या वेळी नियमबाह्य फॅन्सी नंबर प्लेट लावलेली वाहने, कर्णकर्कश आवाज करणारे मॉडिफाईड सायलेंसर वापरणारे वाहनचालक तसेच विना सीटबेल्ट चारचाकी चालविणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत एकूण ४७ प्रकरणे नोंदवून संबंधित वाहनचालकांकडून ₹३६,५०० दंड वसूल करण्यात आला. वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहन चालवावे, अन्यथा अशा प्रकारची कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हांगे, पोलीस हवालदार रविंद्र खाडे, रामचंद्र गाढवे, महिला पोलीस हवालदार नीलम रासकर, वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल सहदेव साबळे, गणेश खाडे, सागर लोखंडे, अजिनाथ नरबटे, मल्हारी खाडे, किरण हिरवे आदींनी सहभाग घेतला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *