देवापुर ज्युनिअर कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड :-प्रतिनिधी 

देवापुर येथील कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे “कशाला जाताय पुणे लातूर येऊन पहा आमचे देवापुर” या उद्देश हेतूने प्रेरित होऊन सुरू केलेल्या इयत्ता बारावी सीईटी प्रकल्पांतर्गत विद्यार्थी शिक्षक पालक मेळावा गुरुवार दिनांक 2/ 7 /2026 रोजी संपन्न झाला.
     सदर कार्यक्रमात एमएचटी-सीईटी 2026 परीक्षेमध्ये 90% टाईलपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या नऊ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान संपन्न झाला. यामध्ये अनुक्रमे घुटुकडे अजय,विरकर सानिका,मोरे आर्य, लुबाळ योगेश, विरकर अथर्व, लोखंडे अश्विनी, काळे साक्षी,सगरे सुमित, मदने प्रीती या विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स देवापूरचे माजी प्राचार्य श्री बी. आर.माने यांच्या हस्ते करण्यात आला.
      या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री कोरडे एम. आर यांच्यावतीने ज्युनिअर कॉलेजमधील यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री.बी.आर. माने यांनी आपल्या मनोगताद्वारे उपस्थित गुणवंत विद्यार्थी यांना स्पर्धा परीक्षा महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री कोरडे एम.आर यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षा व त्या अनुषंगाने जुनिअर कॉलेजमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांविषयी यथोचित मार्गदर्शन केले.
      कार्यक्रमामध्ये कु. सानिका मदने, कु. श्रावणी बाबर यांनी विद्यार्थी मनोगत व्यक्त केले. ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख श्री सातपुते एस.एम, सीईटी विभाग मार्गदर्शक श्री सोळसकर एस ए, सीईटी विभाग प्रमुख श्री आमले व्ही.व्ही यांनी आपल्या मनोगताद्वारे ज्युनिअर कॉलेज मधील सीईटी प्रकल्पाचे सखोल मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री झिरपे आर.एम, सूत्रसंचालन श्री पवार आर. एस व आभार प्रदर्शन श्री बरचे एस.बी यांनी केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *