प्रगतशील डाळिंब बागायतदार गणपत खाडे यांचे दुःखद निधन माण तालुक्यात शोककळा; कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्त्व हरपले

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 
म्हसवड…. प्रतिनिधी

पळशी येथील प्रगतशील डाळिंब बागायतदार तथा तरुण उद्योजक गणपत निवृत्ती खाडे यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या अकस्मात निधनाने माण तालुक्यातील कृषी व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

गणपत खाडे हे प्रगतशील शेतकरी, आधुनिक डाळिंब उत्पादक व ठिबक सिंचन क्षेत्रातील जाणकार व्यावसायिक म्हणून परिचित होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डाळिंब शेतीत त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. ठिबक सिंचन डिलर म्हणूनही त्यांचा कृषी विभाग तसेच परिसरातील शेतकऱ्यांशी मोठा जनसंपर्क होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळच्या वेळी म्हसवड येथे असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटून चक्कर आली. त्यानंतर त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी खाडे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर, संपादक विजय टाकणे पाटील यांच्यासह अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली.

स्वर्गीय गणपत खाडे यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, भाऊ, पत्नी तसेच संकेत व किरण ही दोन मुले असा परिवार आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *