ईद निमित्त नितीनशेठ दोशी यांच्याकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड (प्रतिनिधी) —

रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर साजऱ्या होणाऱ्या ईद-उल-फितर या पवित्र सणानिमित्त माजी नगराध्यक्ष तथा अहिंसा पतसंस्थेचे अध्यक्ष नितीनशेठ दोशी यांनी मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात नितीनशेठ दोशी यांनी मुस्लिम समाजातील बांधवांशी संवाद साधत ईदच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात सांगितले की, रमजान ईद हा संयम, त्याग, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा सण आहे. समाजात परस्पर प्रेम, सौहार्द आणि एकता टिकवण्यासाठी अशा सणांचे विशेष महत्त्व आहे.

यावेळी शहरातील अनेक मान्यवर व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये पत्रकार अहमद मुल्ला, शकील मुल्ला, आदम मुल्ला, डॉ. शोएब मुल्ला, सद्दाम मुल्ला, लुकमान मुल्ला, आरमान मुल्ला, शिकनंदर तांबोळी आदींचा समावेश होता.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आनंदोत्सव साजरा केला. तसेच समाजात शांतता, ऐक्य आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

या उपक्रमामुळे विविध समाजघटकांमध्ये एकात्मता वाढीस लागून सामाजिक सलोखा अधिक दृढ होण्यास मदत होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *