म्हसवडला नगराध्यक्ष व नगरसेवकांचा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने सत्कार
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड/वार्ताहर
म्हसवडला नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा एकत्रित सत्कार करण्याचा पहिला मान माण तालुका केमिस्ट असोसिएशनला मिळाला असल्याची माहिती अध्यक्ष सागर गोंजारी यांनी दिली आहे.
म्हसवड येथे नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा एकत्रित सत्कार करण्यात आला त्यावेळी त्यांनी सांगितले.
नुकतीच म्हसवड नगरपालिकेची निवडणूक पार पडली व नामदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वा खाली भारतीय जनता पार्टीने सर्व २१ जागा जिंकल्या आहेत.
त्याचं पार्श्वभूमीवर म्हसवड मेडिकल असोसिएशनच्या वतीने नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा एकत्रित सत्कार केला. त्यावेळी म्हसवड मेडिकल असोसिएशन च्या पदाधिकारी यांनी म्हसवडला केमिस्ट भवन झालं पाहिजे अशी मागणी केली. त्यावेळी नगराध्यक्ष पूजा विरकर यांनी केमिस्ट भवन चे काम पूर्ण करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
म्हसवड नगरपालिका निवडणूक नुकतीच पार पडली, राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थिती मध्ये म्हसवड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांनी पदभार स्वीकारला त्यानंतर माण तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांनी सत्काराचे आयोजन केले.
या कार्यकर्मासाठी नगराध्यक्ष सौ पूजा विरकर ह्यांच्यासह सर्वच नगरसेवक उपस्थित होते.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि सर्व नगसेवक यांनी आपले मनोगते व्यक्त केली
ह्या कार्यक्रमाचे आयोजन माण तालुका केमिस्ट असोशिएशनचे सचिव श्री. सागर गोंजारी खजिनदार श्री. प्रवीण यादव श्री. सागर लाखे श्री. सुमित व्होरा , श्री. संदीप गोंजारी
श्री अमोल वेदपाठक श्री. राजेंद्र गांधी डॉ. पांडूरंग काटकर श्री. राजेंद्र माने श्री. दीपक महामुनी श्री वर्धमान व्होरा श्री. सुरज मोडासे श्री ईश्वर नरळे श्री दत्ता शेमडे श्री. विशाल नामदास सौ. भाग्यश्री उनउने सौ. अश्विनी गोंजारी सौ. मनिषा यादव सौ. श्रद्धा चोपाडे सौ. मीरा काटकर ह्यांच्या सह सर्व पुरुष आणि महिला केमिस्ट उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तसेच आभार केमिस्ट असोसिएशनचे सदस्य श्री रत्नदीप शेटे यांनी मानून कार्यकर्माची सांगता झाली.

