रथोत्सवात घडला जिवंत चमत्कार! — चार दिवसांत मनोकामना पूर्ण; लोहार कुटुंबाचा दोन हजार नारळांनी नवस फेड
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला |
म्हसवड — प्रतिनिधी
म्हसवड नगरीच्या रथोत्सवाला यंदा भक्तीचा अद्भुत संगम लाभला. लाखो भाविकांच्या साक्षीने चाललेल्या या दिव्य सोहळ्यात असा चमत्कार समोर आला की श्रद्धा आणि भक्ति दोन्हींची प्रचिती भाविकांनी अनुभवली.
श्री सिद्धनाथ महाराज व माता जोगेश्वरी देवींचा रथोत्सव शुक्रवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी भक्तांच्या प्रचंड उत्साहात पार पडला. पाच लाखांहून अधिक भाविकांच्या जयघोषाने संपूर्ण म्हसवड नगरी “जय सिद्धनाथ महाराज”च्या नादात न्हाऊन निघाली. ढोल-ताशांचा गजर, रथाची दिव्य शोभा आणि भक्तिरसात न्हालेली ही यात्रा यंदा एका कारणामुळे विशेष ठरली—एक जिवंत चमत्कारिक अनुभव!
५० फाटा मांडवे येथील शंभुराजे रवी नवगण (लोहार) यांनी रथयात्रेच्या दिवशी सिद्धनाथ महाराजांकडे नवस बोलला होता—“भाऊ माऊलीचे लग्न लवकर लावावे.” भक्तीभावाने केलेली ही प्रार्थना ऐकू आली आणि अवघ्या चार दिवसांत मनोकामना पूर्ण झाली. सोमवारी त्यांच्याकडे सुपारी फुटली आणि दुसऱ्याच दिवशी माऊलीचे लग्न अत्यंत शुभकार्यात पार पडले. हा वेगवान आणि अविश्वसनीय अनुभव पाहून संपूर्ण नवगण कुटुंब भावूक झाले.
मनोमन इच्छा पूर्ण झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आज. शंभुराजे नवगण यांनी दोन हजार नारळांचे भव्य तोरण सिद्धनाथ महाराजांना अर्पण करून आपला नवस भक्तिभावाने फेडला.
या प्रसंगी म्हसवड चे राजे व रथाचे मानकरी श्रीमंत गणपतराव राजेमाने, शकील मुल्ला, इम्रान मुल्ला, आदम मुल्ला, लक्ष्मण लोहार, सचिन लोहार, बापू लोहार, विठोबा लोहार आबा लोहार आदी मान्यवत उपस्थित होते
इतके सुंदर, आकर्षक आणि विशाल नारळ तोरण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
ही घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की—
“नवसाला पावणारे, भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे देव म्हणजे सिद्धनाथ महाराज!”
यंदाचा रथोत्सव या जिवंत चमत्कारामुळे अधिकच संस्मरणीय ठरला. संपूर्ण म्हसवड शहरात भक्तीचा, आनंदाचा आणि शुभेच्छांचा सुवास दरवळला.
सिद्धनाथच्या नावानं चांगभलं!

