बार्शीतील डिलक्स स्पावर पोलिसांची धाड! कथित वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

बार्शी (प्रतिनिधी) :

बार्शी बायपास रोडवरील डिलक्स स्पा सेंटरमध्ये अनैतिक मानवी व्यापार सुरू असल्याच्या आरोपावरून सोलापूर ग्रामीणच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केली. या प्रकरणी स्पाचा मॅनेजर बाबाभाई खाजाबाई चौधरी आणि मालक आकाश काशीद यांच्याविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११.१० वाजता बार्शी बायपास रोडवरील नागोबाचीवाडी शिवारात असलेल्या डिलक्स स्पा सेंटरवर कारवाई करण्यात आली. स्पाचा मॅनेजर आणि मालक यांनी संगनमत करून महिलांना पैशांचे आमिष दाखवत वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांवर स्वतःची उपजीविका करत असल्याचा आरोप आहे.

या कारवाईत पोलिसांनी ५०० रुपयांच्या पाच नोटा, म्हणजेच एकूण २,५०० रुपये, तसेच निरोधाचे एक सिलबंद पाकीट जप्त केले आहे.

या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १४३(२), १४४(२), ३(५) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ मधील कलम ३, ४, ५ आणि ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ६.२८ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलीस नाईक काळे यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव चव्हाण करीत आहेत.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *